Ad will apear here
Next
१६ वर्षीय ग्रेटा थुंबर्गला शांततेच्या ‘नोबेल’साठी नामांकन
ग्रेटा थूंबर्ग

स्वीडनमध्ये वास्तव्य करणाऱ्या १६ वर्षांच्या ग्रेटा थुंबर्ग या मुलीला शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. पाकिस्तानच्या मलाला युसुफझाईने वयाच्या १७व्या वर्षी नोबेल पुरस्कारावर मोहर उमटवली होती. ग्रेटाला हा पुरस्कार मिळाला, तर ती जगातील सर्वांत कमी वयाची नोबेल पुरस्कार विजेती ठरेल.

पर्यावरणप्रेमी ग्रेटा ही ‘अस्पर्जर सिंड्रोम’ नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. हवेचे प्रदूषण, पर्यावरणाच्या समस्या, वृक्षतोड, तापमानात सातत्याने होणारी वाढ या सगळ्याबद्दल आवाज उठविणाऱ्या ग्रेटाला तिच्या या पर्यावरणविषयक कार्यासाठी हे नामांकन जाहीर झाले आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात तिने स्वीडनच्या संसदेसमोर एक आंदोलन केले होते. ‘फ्रायडे फॉर द फ्युचर’ या नावाने पुढे हे आंदोलन गाजले. केवळ स्वीडनमध्येच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रेटाच्या या आंदोलनाची दखल घेतली गेली. 

अनेक देशांमधील माध्यमांनी ग्रेटाच्या या आंदोलनाची आणि ती करत असलेल्या कार्याची दखल घेतली. जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांसहित इतर १०० देशांमध्ये तिचे हे आंदोलन पोहोचले. या देशांमध्येही यासाठी आंदोलने केली गेली. हाच विषय घेऊन ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’मध्येही ग्रेटाला आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली. 

त्यानंतर डिसेंबर २०१८मध्ये पोलंड याठिकाणी झालेल्या ‘युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स’मध्येही ग्रेटाला याबाबत बोलण्याची संधी मिळाली. ‘जमिनीखाली असलेल्या तेल व खनिज साठ्यांची आपण बचत केली पाहिजे. याबाबत जगभरात समानता येण्यासाठीही प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि या गोष्टी जर व्यवस्थेत राहून होऊ शकणार नसतील, तर ती व्यवस्थाच आपण बदलली पाहिजे अथवा नष्ट केली पाहिजे’, अशा आशयाचे भाषण तिने या परिषदेत केले होते. या भाषणानंतर जगभरातील पर्यावरणतज्ज्ञ, अभ्यासक आणि माध्यमे यांनी ग्रेटाची दखल घेतली.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZNEBY
Similar Posts
सखी सौंदर्यवती स्पर्धेचे आयोजन पुणे : सखी या महिलांच्या ग्रुपने ‘सखी सौंदर्यवती’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत १८ ते ६० वर्षे वयोगटातील स्त्रियांना सहभागी होता येणार आहे.
स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागारपदी नीला विखे-पाटील स्टॉकहोम : मराठी मातीत मूळ असलेल्या नीला अशोक विखे-पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागारपदी फेरनियुक्ती झाली असून, या वेळी त्यांच्याकडे अर्थ, गृहबांधणी आणि वित्तीय बाजारपेठा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद सांभाळलेले दिवंगत
‘युवराज ढमाले कॉर्प’कडून पत्रावळीमुक्त दिंडी उपक्रम पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा पत्रावळी मुक्त व्हावा, यासाठी पुण्यातील युवराज ढमाले कॉर्प या कंपनीच्या वतीने पत्रावळीमुक्त दिंडी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत वाल्हे येथे पालखीचा मुक्काम असताना माऊलींच्या पालखी सोहळ्यातील ५० दिंड्यांमधील पाच हजार वारकऱ्यांना स्टीलच्या ताटांचे वाटप करण्यात आले
मोटरसायकलवरून २९ दिवसांत देशभ्रमंतीचा विक्रम करणारी शिल्पा देशाची चारही टोके सर्वांत कमी कालावधीत मोटरसायकलवरून एकटीने गाठून देशभ्रमंती करणारी देशातील पहिली महिला होण्याचा विक्रम मुंबईच्या शिल्पा बालकृष्णन (४३) यांनी केला आहे. २२ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०१८ या २९ दिवसांत म्हणजे अपेक्षेपेक्षा एक दिवस आधीच त्यांनी सुमारे १५ हजार किलोमीटरचे हे अंतर पार केले. त्यांच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language